Home News & Events रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात, कर्जधारकांना दिलासा

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात, कर्जधारकांना दिलासा

1155
0
rbi tax updates

रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या रेपो दरात 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दरातील कपातीनंतर आता नवा दर 5.40 टक्के झाला आहे. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

See more: Projects in Panvel

रिझर्व्ह बँकने जुलै ते सप्टेंबर दरम्यान महागाईचे लक्ष्य ३.१ टक्के ठेवले आहे. तर दुसऱ्या सहामाहीसाठी ७.३ टक्के वयून ७.५ टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा ०.३५ टक्के कपात केली आहे. याआधी कपात ०.२५ टक्केच्या हिशोबाने होत होती.

आरबीआयची ही तिसरी द्विमासिक समीक्षा होती. यानंतर तुमच्या होम लोन, ऑटो लोन आणि दुसऱ्या प्रकारच्या लोनचे ईएमआय कमी होण्याचा रस्ता साफ झाला आहे. अधिकतर जाणकार रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपातीची अपेक्षा करत होते. फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट १.१० टक्के घटवले आहेत. नुकत्याच अर्थ मंत्र्यांनी या कपातीचा लाभ ग्राहकांना पोहोचवण्याचे आदेश बँकांना दिले.

Source:Naviarthkranti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 1 =