Home News & Events वडिलोपार्जित संपत्तीचं महिलांनी काय करायचं? – Ancestral Property For Women

वडिलोपार्जित संपत्तीचं महिलांनी काय करायचं? – Ancestral Property For Women

1553
0
ancestral property for women

वडिलोपार्जित संपत्तीचं महिलांनी काय करायचं? – Steps To Be Followed By Women For Ancestral Property

स्थावर मालमत्तांच्या(Real Estate) प्रकरणांमध्ये उपनिबंधक कार्यालयात जाऊन मालमत्तेतला वाटा आपल्या नावावर हस्तांतरीत करून घ्या. या ठिकाणी उत्तराधिकार प्रमाणपत्राची(Succession Certificate) आवश्यकता असते. पुढचा टप्पा मालमत्तेचं म्युटेशन करण्याचा असतो.

वडिलोपार्जित संपत्तीत(Ancestral Property) महिला जेव्हा दावा करतात, तेव्हा अजूनही अनेकजण आपली नाकं मुरडतात. कुटुंबातल्या व्यक्ती नाराज होतात, कुटुंबात वादविवाद होतात, नातेसंबंध बिघडतात. आपल्याकडे महिलांनी स्वतःचा हक्क मागणं म्हणजे भांडणाला आमंत्रण देणं. त्यामुळे आई, वडील, आजी, आजोबा वा वडिलधारी व्यक्ती गेल्यानंतर अनेक महिला वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क सोडून देण्यातच आपली भलाई मानतात. अशा परिस्थितीत महिला वडिलोपार्जित संपत्तीवरच्या आपल्या हक्कांची सुरक्षा करू शकतात. पण त्यासाठी त्यांनी खालील गोष्टी प्राधान्याने आणि क्रमाने करायला हव्यात.

१. आई-वडील, आजी-आजोबा वा वडिलधारी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रति प्रमाणित (Attested) करून घ्या. हे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्था(Local Government Organisation), म्हणजे नगर परिषद, महानगरपालिका, यांच्या विभागीय वा वॉर्ड ऑफिसमधून देण्यात येतं. काही संस्थांनी या प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध केली आहे.

right to ancestral property for women

२. कुटुंबातल्या सर्व सदस्यांची संमती असेल किंवा इच्छापत्र असेल तर, वडिलोपार्जित संपत्ती(Ancestral Property) वारसदारांच्या नावावर करणं फार सोपं असतं. नॉमिनेशन बँक डिपॉझिट किंवा इन्शुअरन्स सारख्या चल संपत्तीच्या हस्तांतरणात मदत करतं. कुटुंबातल्या सदस्यांमध्ये मतभेद असतील तर इच्छापत्राची अंमलबजावणी हाच सर्वाधिक योग्य पर्याय ठरतो. तो वडिलांच्या स्वअर्जित मालमत्तांसाठी लागू होतो.

३. चल संपत्तीच्या प्रकरणात इच्छापत्र वा नॉमिनी नसेल तर उत्तराधिकार प्रमाणपत्र(Succession Certificate) काढून घ्या. जेव्हा इच्छापत्र न करताच आई-वडिलांचं निधन झालेलं असेल, तेव्हा हे सर्टिफकेट खूप आवश्यक  असतं. अचल वा स्थावर मालमत्तांच्या प्रकरणांमध्ये वारसदार कायद्याच्या नियमांनुसार मालमत्तेची वाटणी होते.

४. स्थावर मालमत्ता(Real Estate) प्रकरणांमध्ये उपनिबंधक कार्यालयात जाऊन मालमत्तेतला वाटा आपल्या नावावर हस्तांतरीत करून घ्या. या ठिकाणी सक्सेशन सर्टिफिकेटची आवश्यकता असते. पुढचा टप्पा मालमत्तेचं म्युटेशन करण्याचा असतो. याचा अर्थ सरकारी नोंदींमध्ये मालमत्तेचे मालकी हक्क आपल्या नावावर करून घेणं.

५. यासंदर्भातली माहिती संबंधित बँकांना द्या, जेणेकरून त्या खात्यांमधून कुणी पैसे काढू शकणार नाही. तसंच बँक खात्यातल्या रकमेतील वाट्यावर दावा करण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेटचा अर्ज द्या.

Source: The Times Property

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 1 =