Home Blog नेरूळ-खारकोपर लोकल दिवाळीपर्यंत?

नेरूळ-खारकोपर लोकल दिवाळीपर्यंत?

1972
0
local train

मध्य रेल्वेवरील नेरूळ ते उरण या नवीन मार्गिकेतील नेरूळ ते खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बुधवारी त्याबाबत सूतोवाच केले. ही मार्गिका सुरू होण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीची आवश्यकता असून ती मिळाल्यानंतर लगेचच ही सेवा सुरू केली जाणार आहे.

नेरूळ ते उरणपर्यंतचा प्रकल्प सन १९९७ मध्ये सुरू झाला होता. सुमारे २० वर्षे रखडलेल्या प्रकल्पातील नेरूळ ते खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी मध्य रेल्वेने दर्शवली होती. ऑक्टोबरमध्ये या पहिल्या टप्प्यातील सेवा सुरू होण्याचे संकेत देण्यात आले होते. पण, रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने या मार्गिकेवरील सेवा अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, नेरूळ ते खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा दिवाळीपर्यंत सेवेत आणण्याचा मानस असल्याचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी स्पष्ट केले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच हा मार्ग सुरक्षित असण्याबाबत प्रमाणपत्र दिले जाईल. त्या प्रमाणपत्राशिवाय सेवा सुरू करता येणार नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

या मार्गावरील स्थानके

नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी, उरण

source:maharashtratimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + 15 =