Home News & Events दुसऱ्या घराच्या कर्जाची परतफेड कशी करायची? – Second Home Loan

दुसऱ्या घराच्या कर्जाची परतफेड कशी करायची? – Second Home Loan

1793
0
दुसऱ्या घराच्या कर्जाची परतफेड

दुसऱ्या घरासाठी कर्ज घेताय? परंतु त्याच्या कर्जाची परतफेड कशी करायची याचा विचार करताय?

दुसऱ्या घराचा विषय निघतो तेव्हा पहिलं घर असताना दुसरं घेणं परवडेल का, त्यासाठी कर्ज घेणं झेपेल का, घराचा मासिक हप्ता भरणं शक्य होईल का, असे अनेक प्रश्न डोक्यात गर्दी करतात. दुसरे घर म्हणजे अनेकांना एक अशक्य गोष्ट वाटते. पहिल्या घराकडे लक्ष द्यावं कि नवीन घराचे हफ्ते फेडत बसावेत? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु, दुसऱ्या घरासाठी कर्ज घेतलं आणि ते फेडण्यासाठी तेच भाड्याने दिलं तर त्याच्या गृहकर्जाचं व्याज कमी करता येऊ शकतं.

प्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांनी ‘मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर’ नावाच्या कथेत म्हटलेलंच आहे की, तुम्हाला मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्याने सोडवायला हवा. कारण एरवी घराचा मामला बिकट आहे.

मुंबईत बघितलं तर घरांचे दर अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत. आपली मुले कमावती झाल्यावर त्यांना मुंबईत घर घेता येईल का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे दुसरं घर घेण्याचा विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही. लोक दुसरं घर मुख्यतः दोन कारणांसाठी घेतात. एक आपला मुलगा किंवा मुलीसाठी आणि दुसरं म्हणजे गुंतवणूक म्हणून.

second home loan

दुसऱ्या घराचा विषय निघतो तेव्हा पहिलं घर असताना दुसरं घेणं परवडेल का, त्यासाठी कर्ज घेणं झेपेल का, घराचा मासिक हप्ता भरणं शक्य होईल का, असे अनेक प्रश्न डोक्यात गर्दी करतात. दुसरं घर घेऊन ते भाड्याने दिलं आणि येणाऱ्या त्या पैशांतून कर्जाची परतफेड केली तर, असंही वाटायला लागतं.

दुसर्या घरासाठी कर्ज आणि ते फेडण्यासाठी तेच भाड्याने दिलं तर त्याच्या गृहकर्जाचं व्याज कमी करता येऊ शकत. कसं, ते खाली बघू या.

समजा,

घराची किंमत : १ कोटी

गृहकर्जाची रक्कम : ५० लाख

व्याजदरः ८.७%

कालावधी: २० वर्ष

गृहकर्जाचा दिनांक : १ ऑक्टोबर २०१९

मासिक हप्ता : ४४०२६/-

एकूण रकमेचा आणि कालावधीचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की, एकूण व्याज ५५ लाख ६६ हजार रु. भरावं लागेल. म्हणजे हे घर सुमारे १ कोटी ५५ लाखांना पडेल.

पण हे घर भाड्याने दिलं आणि त्या भाड्याच्या रकमेचं नीट नियोजन केलं तर भरपूर पैसे वाचवता येणं शक्य आहे.

सध्याचा भाडे दर ३% आहे. घराच्या मूळ किमतीवर वार्षिक ३% दराने भाडं मिळू शकतं. म्हणजे मासिक भाडं २५ हजार रु. असेल तर वार्षिक ३ लाखांचं उत्पन्न मिळू शकतं.

भाड्याच्या रकमेत वार्षिक वाढ साधारणतः १०% एवढी होते.

भाड्यातून आलेली रक्कम आपण एसआययपीच्या माध्यमातून कमी जोखीम असलेल्या फण्डात गुंतवली तर चांगली बचत होऊ शकते.

जर या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर गृहकर्जाची संपूर्ण परतफेड अवघ्या ९ वर्षांमध्ये होऊ शकते. तसं झालं तर हे घर ९१ लाखांमध्ये पडेल. गृहकर्जाच्या व्याजात ३५ लाखांची बचत होऊ शकेल.

वरील उदाहरणानुसार जर गृहकर्जच्या परतफेडीची योजना नीट आखली तर दुसरं घर घेणं वाटतं तेवढं अवघड नाही. आपल्या बजेट नुसार जी काही घराची किंमत असेल, त्यानुसार रकमेत तसेच कालावधीत देखील बचत करता येईल.

Source- Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × four =