Home News & Events मालमत्तेची कागदपत्रं हरवल्यास काय करावे? – Action To Be Taken To Regain...

मालमत्तेची कागदपत्रं हरवल्यास काय करावे? – Action To Be Taken To Regain Lost Property Documents.

2111
0
regain lost property documents

मालमत्तेच्या कागदपत्रांची काळजी घेणे फार महत्वाचे असते. जर तेच गहाळ झाले तर काय करावे?

Get Your Lost Property Documents Back By Following Some Useful Steps:

मालमत्ता महत्त्वाची, त्याचबरोबर त्याची कागपत्रंही तेवढीच महत्त्वाची. मालमत्तेची मालकी सिद्ध करण्यासाठी आणि मालमत्ता व्यवहार करण्यासाठी विक्री करारपत्र आवश्यक असतंच. त्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही, पण तेच करारपत्र अचानक हरवलं किंवा गहाळ झालं तर काय करायचं?

मालमत्तेची मालकी कोणाकडे आहे, याचा सर्वाधिक ठोस पुरवा म्हणजे मालमत्ता विक्री करारपत्र(Sale Deed). या कागदपत्राची मूळ प्रत जोपर्यंत सादर करण्यात येत नाही, तोपर्यंत मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. मालमत्ता कुठलीही असो, त्याच्याशी संबंधित कागदपत्रं जपून ठेवणं फार महत्त्वाचं असतं. ही कागदपत्रं जागेवर नसतील, गहाळ झाली असतील, हरवली असतील, नष्ट झाली असतील, तर तात्काळ काही पावलं उचण्याची गरज असते.

एफआयआर(FIR)

नजिकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा आणि एफआयआर(फस्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल करा. कागदपत्रं हरवली आहेत, हे एफआयआरमध्ये नमूद करा. मालमत्तेच्या मालकाने एफआयआरची कॉपी स्वतःजवळ ठेवावी. भविष्यात अनेक कामांमध्ये ती उपयोगी पडते.

वृत्तपत्रात सूचना(Newspaper Notice)

कागदपत्रं गहाळ झाल्याची वा हरवल्याची नोटीस इंग्रजी आणि प्रादेशिक वृत्तपत्रात द्या. त्यात कोणत्या मालमत्तेची कोणती कागदपत्रं हरवली आहेत, त्याच्या अचूक माहितीचा समावेश असला पाहिजे. तसंच नोटिस मध्ये तुमचा संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. कुणाला ती कागदपत्रं मिळाली तर ती व्यक्ती त्या क्रमांकावर तुमच्याशी संपर्क करू शकते.

i lost my property documents

शेअर सर्टिफिकेट(Share Certificate)

सोसायटीकडून दिलं जाणारं शेअर सर्टिफिकेट हरवल्यास ते पुन्हा मिळवण्यासाठी सोसायटीकडे अर्ज कर. एफआयआरची कॉपी आणि वृत्तपत्रातल्या नोटिशीची प्रत त्या अर्जाला जोडा. सोसायटी काहि शुल्क आकारून शेअर सर्टिफिकेट देते.

प्रतिज्ञापत्र(affidavit)

मालमत्तेच्या मालकाने निबंधक कार्यालयाला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं. ते स्टॅम्प पेपरवर द्यावं. या पत्रात मालमत्तेची माहिती, गहाळ कागदपत्रांची माहिती द्यावी आणि त्याला एफआयआरची कॉपी आणि वृत्तपत्र नोटिशीची प्रत जोडावी. हे प्रतिज्ञापत्रं साक्षांकित करून ते नोटरी आणि नोंदणीकृत करणं अत्यावश्यक आहे.

दुसरी प्रत मिळवण्यासाठी अर्ज(Duplicate Copy)

सर्व अर्ज करत असतानाच निबंधक कार्यालयाकडे विक्री करारपत्राची दुसरी प्रत(duplicate) मिळण्यासाठीही अर्ज  करा. त्यासाठी काही शुल्क आकारण्यात येतात, ती निबंधक कार्यालयाकडे जमा करावीत. अर्जासोबत एफआयआर, वृत्तफत्र नोटीस, शेअर सर्टिफकेट आणि नोटरी आदींच्या प्रती जोडा. काही राज्यं वा शहरं अशा प्रकरणांमध्ये ऑनलाइन तक्रारी दाखल करून घेतात. त्यासाठी एफआयआर दाखल करायला परवानगी देतात. तुम्हाला हा पर्याय उपलब्ध असेल तर त्याची निवड करा.

Source: Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =