Home News & Events गृहविमा खरेदी करताना काय लक्षात ठेवायचं?- Things To Be Noted About Home...

गृहविमा खरेदी करताना काय लक्षात ठेवायचं?- Things To Be Noted About Home Insurance

1845
0
tips to choose home insurance

गृहविमा(Home Insurance) हि आपल्या घर खरेदीत तसेच गृह संरक्षणात अत्यंत महत्वाची गोष्ट असते.

वन बेडरूम फ्लॅट असो किंवा पाच बेडरूम्सचा बंगला, घर हे प्रत्येकालाच प्रिय असतं. कारण त्यात आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक केलेली असते. हे घरकूल सुरक्षित असावं, चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग वा अन्य कुठल्याही कारणाने त्याचं नुकसान होऊ नये, असं नेहमीच आपल्याला वाटतं. त्यामुळे गृहविमा(Home Insurance) काढून घराला विमा कवच देणं गरजेचं आहे. नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती आणि घरातील दुघंटनांपासून होणाऱ्या नुकसान भरपाईची हमी गृहविमा देतो.

गृहविमा का घ्यायचा?- Why Home Insurance?

आर्थिक स्थैयांसाठी गृहविमा घ्यावा. कुठल्याही कारणाने घराचं किंवा घरातल्या वस्तूंचं नुकसान झालं तर त्याची आर्थिक झळ लागू नये म्हणून गृहविमा घेणं आवश्यक आहे. छोट्या रकमेचा प्रिमियम भरला तर विमा कंपनी घराचं किंवा वस्तूंचं झालेलं नुकसान भरून देते.

विमा संरक्षणाचे प्रकार- Types Of Home Insurance

गृहविमा योजना खालील गोष्टींना विमा संरक्षण (Cover) देतात.

मुख्य संरचना(Main Structure): घराची मुख्य संरचना (Structure) करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी विमा योजनेत तरतूद केलेली रक्कम विमाधारकाला(Insurance Holder) देण्यात येते.

विषयवस्तू(Theme): तुमच्या वैयक्तिक वस्तू या वर्गात येतात. दागिने, हलकी उपकरणं, कलाकृती, महागड्या चित्राकृती आणि मौल्यवान वस्तू आदींना विमा संरक्षण मिळतं.

उत्तरदायित्व(Liability): अन्य लोकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं तरी ते गृहविमा योजनेच्या कक्षेत येतं.

संक्रमण(Transition): एखाद्या दुर्घटनेत संपूण घरच उद्ध्वस्त झालं तर ते दुरूस्त होईपर्यंत त्या व्यक्तीला दुसऱ्या घरात राहावं लागतं. त्याचा खर्चही गृहविमा योजनेच्या कक्षेत येतो.

home insurance tips

गृहविमा घेताना काय काळजी घ्यायची?- Care To Be Taken For Home Insurance
संरक्षण आणि हप्ता(Cover & EMI)

भविष्यात घराला किती मोठ्या दुघंटनेचा सामना करावा लागू शकतो, याचं मुल्यमापन फार महत्त्वाचं असतं. उदा. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा भागात राहत असाल तर पुरामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई गृहविमा योजनेत मिळत असल्याची खात्री करून घ्या. नैसर्गिक आपत्तीशिवाय होणारं नुकसान म्हणजे मानवनिर्मित नुकसान. चोरी, घरफोडी वा दरोडा आदींमुळे होणार्या नुकसानाचाही अंतर्भाव विमा योजनेत असायला हवा. गृहविमा घेताना प्रिमियम बजेटमध्ये बसायला हवं. वेगवेगळ्या विमा कंपन्यांचे प्रिमियम आणि कव्हरेज यांची ऑनलाइन तुलना करू शकता.

ऍड-ऑन कव्हर(Add-On-Cover)

गृहविमा योजनेत बेसिक कव्हर मिळतं. त्याचबरोबर आणखी काही कव्हर किंवा अतिरिक्त लाभ होऊ शकतो का, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. उदा. घराच्या चाव्या हरवल्या तर विमा कंपनी त्याची किंमत देईल. त्यात डॉग इन्शुअरन्स, वॉलेट कव्हर, रेण्ट कव्हर मिळतो का, हेही बघायला पाहिजे.

क्लेम सेटलमेण्ट(Claim Settlement)

गृहविमा देणाऱ्या कंपनीचं क्लेम सेटलमेण्टचं प्रमाण किती आहे, हे जरूर बघितलं पाहिजे. थोडासा जास्त द्यावा लागला तरी हरकत नाही, पण क्लेम सेटलमेण्टचं प्रमाण योग्य असणाऱ्या कंपनीकडून विमा योजना घ्या. हीतर विमा घेण्याचा उद्देश सफल होणार नाही.

कंपनीचं आर्थिक स्थैर्य(Financial Rating)

फायनान्शियल रेटिंग हे संबंधित विमा कंपनीच्या आर्थिक स्थेर्याचं निदशंक असतं. त्यावरून कंपनीची आर्थिक क्षमता कळते. ती चांगली असेल तर कंपनी विमाधारकांना योग्य प्रकारे विमा संरक्षण देऊ शकते. घर ही एक मोठी गुंतवणुक असते, जी आयुष्य उभं करण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे त्या घराला विमा संरक्षण द्यायलाच हवं.

Source: Maharashtra Times.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 3 =